UPSC साठी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ मध्ये मोफत प्रशिक्षण
पुणे: केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी राज्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा या हेतूने उच्च व तंत्र शिक्षण विभागा मार्फत राज्यांमध्ये अनेक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहे .त्यामधील शिवाजी प्रबोधिनी पब्लिक ट्रस्ट ही संस्था Upsc civil service चे विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहे .शिवाजी प्रबोधनी ट्रस्टच्या बाळासाहेब ठाकरे आयएएस अकॅडमी द्वारे एक वर्ष कालावधीचे 1000 विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवा परीक्षेचे मोफत प्रशिक्षण टिळक महाराष्ट्र विद्यापीठ देणार आहे अशी माहिती टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉक्टर अभिजित जोशी यांनी दिली.
आपल्या विभागात अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी आपली पदवी पूर्ण केली आहे अथवा जे विद्यार्थी पदवीच्या अंतिम वर्षाला आहेत .असे विद्यार्थी संस्थेकडून मोफत प्रशिक्षणासाठी घेण्यात येणारी चाळणी परीक्षा देऊ शकतात. या परीक्षेत पात्र ठरणाऱ्या पहिल्या एक हजार विद्यार्थ्यांना कॉलेजमधल्या प्राध्यापकांकडून ऑनलाईन मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे .या सुविधेचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन संस्थेने केले आहे .विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी 23 जुलै 2021पर्यंत ऑनलाइन नोंदणी करताना www. sy .pias.com या संकेतस्थळावर भेट द्यावी अशी माहिती अभिजित जोशी यांनी दिली.
