Monday, June 15, 2026
Latest NewsPUNE

Pune- दिवसभरात 354 नवीन कोरोना रुग्ण तर 331रुग्णांना डिस्चार्ज

पुणे: पुणे शहरामध्ये कोरोनाचा  प्रादुर्भाव परत वाढायला लागला आहे . मागील काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये नवीन रुग्णांची पण वाढायला लागली आहे तर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या  वाढत  आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 354 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे  तर 331रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 83हजार 844
इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 72 हजार 240इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 9तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 4 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8690जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 2954 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण  आहेत. यामध्ये 2346 रुग्ण गंभीर आहेत.
आज दिवसभरात पुणे शहरातील विविध केंद्रावर 7058स्वॅब  तपासण्या करण्यात आल्या आहेत.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading