जबरदस्त! OLA इलेक्ट्रिक स्कुटर बुक करा फक्त 499 रुपयांत
पुणे :ओला इलेक्ट्रिकने भारतातल्या इलेक्ट्रिक व्हेईकल क्रांतीला नवी चेतना देताना आपल्या दीर्घकाळ प्रतीक्षेत असणाऱ्या आणि मोठी अपेक्षा असणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर साठीची नोंदणी सुरु होत असल्याचे आज जाहीर केले.
आजपासून ग्राहक olaelectric.com या वेबसाईटवर ४९९ रुपयांची परत मिळू शकणारी अनामत रक्कम भरून आपली ओला स्कूटर नोंदवू शकणार आहेत. जे आता नोंदणी करतील त्यांना प्राधान्याने गाडी मिळू शकेल.
योग्य वेग, अभूतपूर्व रेंज, सर्वाधिक बूट स्पेस आणि जोडीला प्रगत तंत्रज्ञान यांसह ओला स्कूटर क्रांतिकारी अनुभव देईल आणि ग्राहक विकत घेऊ शकतील अशी सर्वोत्तम स्कूटर असेल. व्यापक पातळीवर सर्वांना उपलब्ध होऊ शकेल अशी त्याची किंमत असेल. आगामी काही दिवसांत ओला आपल्या स्कूटरची वैशिष्ट्ये आणि किंमत जाहीर करेल.
“आगामी इलेक्ट्रिक व्हेईकल्सच्या आमच्या मालिकेतील पहिली इलेक्ट्रिक स्कूटर साठीची नोंदणी आम्ही खुली करत असल्यामुळे आजपासून भारतातल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या क्रांतीला सुरुवात होत आहे. अतुलनीय कामगिरी, तंत्रज्ञान आणि वाजवी किंमतीला सुयोग्य रचना यामुळे शाश्वत दळणवळण क्षेत्राला चालना मिळायला मदत होईल. इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर आघाडीवर राहण्याची संधी आणि क्षमता भारतामध्ये आहे आणि ओला मध्ये हे काम आघाडीवरून होत असल्याचा आम्हांला अभिमान आहे,” असे ओलाचे अध्यक्ष आणि समूह मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अगरवाल म्हणाले.
