Saturday, June 13, 2026
Latest NewsNATIONALSports

टीम इंडियात करोनाचा शिरकाव, ऋषभ पंतसह दोघांना लागण

मुंबई : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियातील दोन खेळाडूंना करोंनाची लागण झाल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. प्रोटोकॉलनुसार, कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या खेळाडूचे नाव जाहीर करता येत नाही. त्यामुळे अद्याप इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, टीम इंडियातील ऋषभ पंत व आणखी एक जण  कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

ऋषभ पंत काही दिवसांपूर्वी युरो कपचा सामना पाहण्यासाठी गेला होता. त्यानंतर ऋषभ पंतला घशात खवखव, थंडी वाजणे अशी लक्षणं दिसून आली होती. त्याला सध्या आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. अशातच टीमसोबत पुन्हा सराव सुरु करण्यापूर्वी ऋषभला पुन्हा एकदा कोरोना चाचणी करावी लागणार आहे. कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर ऋषभ पंतला संघात पुनरागमन करता येईल.

कोरोनाची लागण झालेल्या खेळाडूच्या संपर्कात आलेल्या खेळाडूंना तीन दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे. आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर हे खेळाडू संघातील इतर खेळाडूंसोबत जोडले जातील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading