खडकवासला धरणात 29.58 टक्के पाणीसाठा जमा

पुणे: पावसाने विश्रांती घेतल्याने खडकवासला धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे .सद्यस्थितीत खडकवासला धरणात 10.62 टीएमसी म्हणजे 29.58 टक्के इतका आहे. हा उपलब्ध पाणीसाठा शहराला सात महिने पुरेल इतका आहे अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे अधिकारी कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी दिली.

यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन झाले पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ओढे-नाल्या मार्फत धरणांमध्ये पाणी जमा होऊ लागले. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली नाही. सध्या खडकवासला धरणात 0.66 टीएम सी म्हणजे 33.21 टक्के पानशेत धरणांमध्ये 4.11 टीएमसी वरसगाव मध्ये 3.23 टी एम सी आणि टेमघर मध्ये 65 टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. अशी माहिती विजय पाटील यांनी दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: