‘जुनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन’ च्या विद्यार्थिनींचे यश

पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘जुनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन’ (इंग्रजी माध्यम डीएलएड कॉलेज) आजम कँपस पुणेच्या विद्यार्थिनींनी अंजुमन इस्लाम संस्थेच्या पॉलिटेक्निक आयोजित दिनांक ११ ते २९ जून २०२१ दरम्यान विविध कलाविषयक स्पर्धात घवघवीत यश मिळवले. क्रिएटिव्ह आर्ट स्पर्धेत तशू चव्हाणने प्रथम, सानिया सय्यदने द्वितीय स्थान प्राप्त केले. तसेच मुबशिरा सय्यद- मेंदी स्पर्धेत प्रथम तर बद्रुन्नीसा पठाण- डू इट युवरसेल्फ स्पर्धेत प्रथम स्थानावर यश मिळवले. तसेच विभागप्रमुख रिझवाना दौलताबाद यांनी यशप्राप्त विद्यार्थिनींचे व त्यांच्या मार्गदर्शिका शिक्षिका नवशिन शेख यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: