पुणे शहरात गेल्या चोवीस तासात 331नवीन रुग्ण 277 रुग्णांना डिस्चार्ज
पुणे : शहरामध्ये कोरोनाचा प्राढुभाव वाढत आहे आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या तीनशे च्या वरआली आहे तर अक्टिव्ह रुग्णांची संख्या
तीन हजाराच्या पुढे आल्याने महानगरपालिकेची व आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे . पुण्यात येत्या 24 तासात पुणे शहरामध्ये 331नवीन रुग्णांची नोंद झाली आहे तर 277 रुग्ण बरी झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 82 हजार 582 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत त्यापैकी 4लाख 70 हजार 997इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या चोवीस तासात 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे यामध्ये शहरातील
12तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 7 रुग्णांचा समावेश आहे आतापर्यंत पुणे शहरात 8668 जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 8099 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत.
शहरांमध्ये सध्या 2917 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत
त्यापैकी 227रुग्ण गंभीर आहेत अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
