राज्यात आणखी चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता

  • रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, पुणे जिल्ह्य़ांना रेड अलर्ट
  • सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, धुळे या जिल्ह्य़ांना ऑरेंज अलर्ट
  • विदर्भ व मराठवाडय़ात यलो अलर्ट (विजांसह पाऊस)

पुणे : गेल्या तीन दिवसांपासून कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर आज (14 जुलै) पासून पुढील चार दिवस कोकण, घाटमाथासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र विरून गेले आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र व त्यापासून उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण छत्तीसगड, दक्षिण ओडिशा, बंगालच्या उपसागरापर्यंत असलेल्या हवेचा कमी दाबाचा पट्टा आदी कारणांमुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यानुसार  कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, पुणे जिल्ह्य़ांना रेड अलर्ट , तर सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, धुळे या जिल्ह्य़ांना ऑरेंज अलर्ट, तसेच विदर्भ व मराठवाडय़ात यलो अलर्ट (विजांसह पाऊस) असा पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण देश व्यापला असल्याचे हवामान विभागाने मंगळवारी जाहीर के ले. दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेनुसार मोसमी वारे ८ जुलै रोजी देश व्यापतात. यंदा त्यास विलंब झाला.
गेल्या २४ तासांत पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्य़ात दोन मिलिमीटर, महाबळेश्वर ३८ मि.मी., तर सांगली आणि सोलापुरात प्रत्येकी एक मि.मी. पावसाची नोंद झाली. मुंबईत ३३ मि.मी., अलिबाग नऊ मि.मी., रत्नागिरीत ३७ मि.मी. आणि डहाणूला ५१ मि.मी. पाऊस झाला. विदर्भात सर्वाधिक बुलढाण्यात १३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात

Leave a Reply

%d bloggers like this: