Saturday, September 5, 2026
Latest NewsPUNE

पीएमपी चालक खून प्रकरणात चौघांना अटक

पुणे : पीएमपी चालक खून प्रकरणाचा तपास लावण्यात गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाला २४ तासाच्या आत यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आत्तार्यंत चौघांना अटक केली आहे.

एका गुन्ह्यात विरोधी व्यक्तीला जामीन राहिल्याच्या कारणातून हा खून झाला असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. ऋषीकेश संजय बोरगावे (वय.31,रा.भेकराईनगर फुरसूंगी),अक्षय हनुमंत जाधव (वय.21,रा. फुरसूंगी),प्रज्वल सचिन जाधव (वय.20,रा. काळेपडळ), तुषार सुर्यकांत जगताप (वय.21, गाडीतळ हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. पीएमपी चालक चा रस्त्यात गाठून खून करण्यात आला होता.


यातील ऋषीकेश बोरगावे व अक्षय जाधव या दोघांना उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरागा येथून तर इतर दोघांना पुणे परिसरात ताब्यात घेतण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणात अन्य एका फरार आरोपीचा पोलिस शोध घेत असल्याचे समजते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading