Tuesday, June 16, 2026
ENTERTAINMENTLatest News

अजय देवगणच्या बहुचर्चित ‘भूज’चा ट्रेलर रिलीज

देशभक्तीच्या भावनेने उर अभिमानाने भरेल अशा अजय देवगणच्या बहुचर्चित ‘भूज’ चित्रपटाचा चा ट्रेलर आज रिलीज झाला. चफखल संवाद, प्रभावी पार्श्वसंगीत, अॅक्शन, थ्रीलरने भरलेला ‘भूज’ चित्रपाटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. गुजरात मधील भूजमध्ये 1971 साली काय घडलं? इंडियन एअर फोर्स आणि आर्मीने अचानक ओढवलेली युद्ध परिस्थिती कशी हाताळली? तेथील सैनिकांनी जीवाची परवा न करता इतिहास कसा रचला यांची कल्पना या ट्रेलर वरून आपल्याला येते. हा चित्रपट इंडियन एअर फोर्स ला उत्तम असा ट्रीबुट असणार आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण, संजय दत्त, शदर केळकर आणि सोनाक्षी सिन्हा यांची प्रमुख भूमिका आहे. तर एरवी आपल्या डान्सने भाव खाऊन जाणारी नोरा फत्तेही ही सीक्रेट एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिषेक दुधाया यांनी या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. ‘तानाजी’ची जादू कायम असताना ही जादू पूर्णपणे एनकॅश करण्याचा या चित्रपटाचा प्रयत्न असणार आहे. येत्या 13 ऑगस्टला डिस्ने हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading