उदय ज्योती फाउंडेशन तर्फे आदीवासी कुटुंबाना साडी, कपडे, लहान मुलांची खेळणी भेट
पुणे: वेल्हे,मुळशी,भोर तालुक्यातील आदीवासी कातकरी समाजातील कुटुंबाना ऊन, वारा,पाऊस या पासुन संरक्षण व्हावे या साठी दिनांक 11जुलै 2021 रोजी. आदीवासी कुटुंबाना साडी,कपडे,लहान मुलांची खेळणी/कपडे , कातकरी पाड्यांवर जाऊन वाटप करण्यात आले. या वेळी उदय ज्योती फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश दारवटकर,अभिजित चव्हाण, तुषार आडकर,संकेत येवले, रोहित नलावडे , वैभव जागडे, संतोष वरपे, विठ्ठल साळेकर, समाधान बनसोडे,संचित निवंगुने आदी सहभागी झाले होते
