Pune – पीएमपी बस चालकाचा रस्त्यात गाठून निर्घृण खून
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ( पीएमपी) चालकाला रस्त्यात गाठून त्याचा निर्घृण खून करून करण्यात आला आहे. तसेच त्याचा चेहरा विद्रुप करून मृतदेह हांडेवाडी परिसरातील मोकळ्या जागेत टाकल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी दुपारी उघडकीस आला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळातच कोंढवा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. गौतम मच्छिंद्र साळुंखे (29, रा. पापडेवस्ती, ढमाळवाडी, फुरसुंगी) असे खून झालेल्या तरूण चालकाचे नाव आहे. साळुंखे हे स्वारगेट डेपोमध्ये चालक म्हणून कार्यरत होते. दरम्यान, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मिळालेल्या माहितीनुसार, साळुंखे यांनी शनिवारी (दि.10) स्वारगेट ते धायरी या मार्गावर ड्युटी केली. ड्युटी संपल्यानंतर रात्री पावणे दहाच्या सुमारास बस डेपोमध्ये जमा केली. त्यानंतर त्यांचा आज सकाळी कात्रज बायपास या ठिकाणी मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. साळुंखे यांचा खुन कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी
आरोपीचा शोध सुरु केला आहे.
