Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

केंद्र सरकारच्या महागाई धोरणा विरोधात काँग्रेसचे आंदोलन

पुणे : पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारच्या इंधन, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या महागाई विरोधात आज रोजी प्रभाग क्रमांक १६, मंगळवार पेठ येथील मोदी पेट्रोल पंपावर स्वाक्षरी मोहीम घेऊन आंदोलन करण्यात आले. पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आंदोलन दरम्यान घेण्यात आल्या.

पुणे मनपा नगरसेविका सुजाता शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सरकारचा निषेध म्हणून आंदोलन करण्यात आले. प्रसंगी बहुत हुई महंगाई की मार… बस करो मोदी सरकार… या सरकारचे करायचं काय… खाली डोकं वर पाय… अशा प्रकारे केंद्र सरकारच्या महागाई धोरणाविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली.

आंदोलन प्रसंगी बोलताना शेट्टी म्हणाल्या, या महागाईच्या विरोधात आणखी तीव्र आंदोलने भविष्यामध्ये करू आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम करू. सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडू. या जनआंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading