डाॅ. प्रमोद ढेंबरे यांना कोरोना योध्दा सन्मान
पुणे : बी.टी.कवडे रस्त्यावरील फीडेलिटी डायग्नोस्टीक सेंटरचे प्रमुख संचालक डाॅक्टर प्रमोद शिवाजीराव ढेंबरे यांना कर्तव्य फाउंडेशनतर्फे कोरोना योध्दा सन्मानाने गौरविण्यात आले. डाॅ.बंटी धर्मा यांच्या हस्ते त्यांना शाल व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले,यावेळेस फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे,कार्याध्यक्ष अशोक देशमुख व रवी पवार उपस्थित होते.
डाॅक्टर ढेंबरे यांनी कोरोना संसर्ग काळात आपल्या फीडेलिटी डायग्नोस्टीक सेंटरच्या माध्यमातून असंख्य गरीब व गरजू रूग्णांची अल्पदरात एच.आर.सीटी स्कॅनची चाचणी केली होती. तसेच त्यांनी डायग्नोस्टीक सेटंरच्या वापरासाठी कोरोना काळात अत्याधुनिक साॅफ्टवेअरची निर्मितीही केली आहे. डाॅक्टर ढेंबरे यांच्या सामाजिक बांधिलकीची दखल घेऊन त्यांना कोरोना योध्दा सन्मानाने गौरविण्यात आल्याचे मत यावेळेस विकास भांबुरे यांनी व्यक्त केले व त्यांना पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.
