Friday, September 4, 2026
Latest NewsPUNE

इंधन, स्वयपांक गॅस व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या महागाई विरोधात काँग्रेसचा एल्गार

पुणे : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मागील ७ वर्षांच्या काळात महागाईने लोकांचे जगणे कठीण केले आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल, डाळींच्या किमती सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. मोदी सरकारने निर्माण केलेल्या या कृत्रिम महागाईविरोधात काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करणार आहे.

  पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दि. ८ जुलै ते दि. १६ पर्यंत पुणे शहरात इंधन, गॅस दरवाढ व महागाईच्या विरोधात जनआंदोलन करणार आहे.  दि. ८ जुलै रोजी सकाळी १०.०० वा., भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कॅम्प ते विभागीय आयुक्त कार्यालय (कौन्सिल हॉल) पर्यंत सायकल यात्रा काढून लोकांमध्ये महागाई बाबत जनजागरण करणार आहे. सहकार व कृषी राज्यमंत्री मा. ना. डॉ. विश्वजीत कदम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मा. बसवराज पाटील व इतर मान्यवर या सायकल यात्रेत सहभागी होणार आहेत.

   दि. ९ जुलै पुणे शहर महिला काँग्रेसतर्फे सकाळी ११.०० वा., जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महागाईच्या विरोधात आंदोलन करणार आहे.

   दि. १० जुलै रोजी सकाळी १०.०० वा., काँग्रेस भवन, शिवाजीनगर येथून सायकल यात्रेची सुरूवात होणार आहे. ही सायकल यात्रा काँग्रेस भवन – बालगंधर्व चौक – जंगलीमहाराज रस्ता – खंडोजीबाबा चौक – अलका टॉकीज चौक – नवी पेठ पेट्रोल पंप येथे समारोप होणार आहे.

  दि. ११ जुलै रोजी काँग्रेस पक्षाच्या फ्रंटल व विविध सेलतर्फे प्रत्येक ब्लॉकमध्ये जिथे पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणी इंधन दरवाढीच्या विरोधात नागरिकांची सह्यांची मोहिम राबविणार आहे.  

   दि. १२ व १३ जुलै रोजी ब्लॉक काँग्रेस कमिटीतर्फे इंधन, गॅस दरवाढ व महागाईच्या विरोधात आपापल्या ब्लॉकमध्ये किमान ५ कि. मी. सायकल यात्रा काढून पेट्रोल पंपावर समारोप करणार. त्या ठिकाणी या महागाईबद्दल जनजागरण करणार.

   दि. १२ ते १५ जुलै रोजी महिला काँग्रेसतर्फे ब्लॉक पातळीवर आंदोलन करण्यात येणार आहे. असे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष रमेश बागवे यांनी या पत्रकाद्वारे कळविले आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading