दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 150 नवीन रुग्ण, 249 रुग्णांना डिस्चार्ज
पुणे:पुणे शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे आज पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची
संख्या तीन हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून शहरामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन रुग्णांची संख्या अधिक होती. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 150 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 249 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 79 हजार 882 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 68 हजार 586 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 05 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 10 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8617 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 2679 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 290 रुग्ण गंभीर आहेत. तर 448 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 4084 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत 26 लाख 97 हजार 692 तपासणी करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
