Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

राष्ट्रवादी चे पुण्यात महागाई विरुद्ध जन आक्रोश आंदोलन


पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर तर्फे केंद्र सरकारने जी महागाई वाढ केली आहे त्या विरोधात बालगंधर्व चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जन आंदोलन करण्यात आले.

ह्या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर प्रवक्ते अंकुश काकडे,
पदाधिकारी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता कडून या वेळेस केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. मोदीजी तुम हमे नही चाहिये हमारे बुरे दिन लोटा दो भरलेला गॅस काढतोय सर्वसामान्यांचा
श्वास अश्या घोषणा देण्यात आल्या.
कोरोना व टाळेबंदी मुळे आधीच जनता आर्थिक कोंडीत सापडली आहे केंद्र सरकारनी इंधन, पेट्रोल, गॅस, डिझेल दर वाढवले आहेत. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे पेट्रोलचा दर शंभर रुपये पार गेला आहे गॅस हा आधी 500 रुपये भेटायाचा पण तो आता 900 रुपये पर्यंत जात आहे.
सर्वसामान्यांची या महागाई मधून सर्वसामान्य जनतेची सुटका झालीच पाहिजे यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही जन आक्रोश आंदोलन अख्या महाराष्ट्रभर करत आहोत.असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आंदोलनाच्या वेळी म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading