Saturday, June 20, 2026
ENTERTAINMENTLatest NewsNATIONALTOP NEWS

अभिनेत्री यामी गौतमला ईडीकडून समन्स

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमला ईडी (सक्तवसुली संचलनालय) कडून समन्स जारी करण्यात आला आहे. यामीच्या बँक खात्यातील काही परदेशी व्यवहारात गोंधळ आढळून असल्याने Foreign Exchange Management Act अंतर्गत हा समन्स बाजावण्यात आला आहे. येत्या ७ जुलैला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असून मुंबईत ईडीच्या झोन-२ मध्ये तिची चौकशी होणार आहे.

दरम्यान, विक्की डोनर, बाला, बदलापुर, टोटल सियापा, उरी, काबिल अशा अनेक सिनेमांमधून यामीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल आहे. तर येत्या काळातही यामी अभिषेक बच्चनसोबत ‘दसवी पास’ या सिनेमात वकिलाच्या भूमिकेत झळकणार आहे. यसोबतच ती सैफ अली खान आणि अर्जुन कपूरसोबत ‘भूत पोलिस’ या हॉरर कॉमेडी सिनेमात चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. यामी गौतम ही नुकतिच लागनबंधनात अडकली असून तिने ‘उरी’ फेम दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्नगाठ बांधली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading