PMP – 225 स्क्रॅप बसेस विक्रीच्या लिलावातून 7 काेटी 89 लाख रुपये मिळाले

पुणे :पुणे महानगर परिवहन महामंडळला  225 स्क्रॅप बसेस विक्रीच्या लिलावातून सुमारे 7काेटी 89 लाख रुपये मिळाले आहे. विक्रीच्या प्रक्रीयेत बदल केल्याने अधिक रक्कम मिळण्यास मदत झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

पीएमपीने यापूर्वी स्क्रॅप बसेस व स्क्रॅप मटेरियलची डिसेंबर 2020 मध्ये ऑनलाईन विक्री केली हाेती. तेव्हा झालेल्या लिलावमध्ये पीएमपीच्या स्क्रॅप झालेल्या 297 बसेस 8 टेम्पो विक्रिसाठी ठेवण्यात आल्या हाेत्या. या बसेस आणि टेम्पाेच्या विक्रीतून पीएमपीला 6काेटी 5 लाख 50 हजार रुपये रक्कम मिळाली हाेती. त्याच धर्तीवर पीएमपीने नुकतेच 224स्क्रॅप बसेसचा लिलाव नुुकताच केला. या लिलावात पीएमपीला 8 काेटी 99 लाख 45 हजार रुपये इतकी रक्कम मिळाली. दोन्ही लिलावाची तुलना करता डिसेंबर महीन्यात झालेल्या लिलावात सरासरी प्रती बस 7लाख 9 हजार रुपये रक्कम मिळाली हाेती. तर नुकतेच झालेल्या लिलावात सरासरी प्रति बस मागे 9 लाख 6हजार रुपये रक्कम प्राप्त झाले. लिलाव प्रक्रीयेत बदल केल्यानेच ही रक्कम जादा मिळाल्याचे पीएमपी प्रशासनाने कळविले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: