‘रोटरी क्लब ऑफ पूना नॉर्थ’च्या अध्यक्षपदी मनीषा कोनकर
पुणे : ‘रोटरी क्लब ऑफ पूना नॉर्थ’च्या अध्यक्षपदी मनीषा कोनकर यांची तर सचिवपदी दीप्ती पुजारी यांची निवड झाली आहे.ही निवड २०२१-२२ या वर्षासाठी आहे.मनीषा कोनकर या क्लबच्या ६१ व्या अध्यक्ष असणार आहेत. रोटरी क्लब ऑफ पूना नॉर्थच्या नूतन संचालक मंडळाचा पदग्रहण समारंभ ३० जून रोजी होणार आहे.या कार्यक्रमासाठी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४० चे माजी प्रांतपाल डॉ.उल्हास कोल्हटकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत,माजी प्रांतपाल रवी धोत्रे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. हा क्लब १९६० साली स्थापन झाला असून सामाजिक प्रकल्पांमध्ये अग्रेसर आहे.
