Friday, June 19, 2026
Latest NewsPUNE

गौरव घुले यांच्याकडून गरजू  रिक्षाचालकांना मोफत सीएनजी कुपन वाटप

पुणे: महेश सोसायटीचे चेअरमन गौरव घुले यांनी आज गरजू रिक्षाचालकांना मोफत सीएनजी कूपन वाटप केले. धनकवडी येथील तीन हत्ती चौकात सीएनजी पेट्रोल पंपासमोर रिक्षा चालकांना मोफत सीएनजी चे कुंपन वाटप केले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते अभिजीत पवार, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कदम, गौरव घुले यांचा मित्रपरिवार व मोठ्या संख्येने रिक्षा चालक उपस्थित होते.

कोराना व टाळेबंदी मुळे गरीब लोकांचे खूप नुकसान झाले आहे गेल्या दोन महिन्यापासून सगळी लोकं घरी आहेत लोकांना टाळेबंदी मुळे आर्थिक समस्या ची खूप अडचण आहे रिक्षाचालकांच्या दोन महिने रिक्षा बंद असून त्यांना बँकेचे हप्ते भरण्यास खूप अडचण येत आहे आम्ही टाळेबंदी काळात स्वतःहा वर्गणी काढून गरजू लोकांना मदत करण्याचे ठरविले
आम्ही मागच्या वेळेस तृतीयपंथीयांना याना मदत केली होती आम्ही तृतीयपंथीयांना धान्य व  मास्क मोफत वाटप केले आम्ही ठरवले रिक्षाचालकांना मोफत सीएनजी कुपन वाटप करायचे आम्ही रिक्षाचालकांच्या आर्थिक समस्या जाणून घेतल्या
आम्ही आमच्या प्रभागातील जेवढे गरजू रिक्षाचालक आहेत त्यांना मदत करण्याचे ठरवले .असे गौरव घुले म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading