Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

Pune – येरवड्यात शिवसेनेच्या वतीने अपंगांसाठी लसीकरण

पुणे – शिवसेना 55 वा वर्धापन दिनानिमित्त येरवड्यात दिव्यांग व अपंग नागरिकांसाठी लसीकरणाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला दिव्यांग नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

शिवसेनेच्या वतीने यावेळी उपस्थित दिव्यांग व त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी चहा-नाश्ता,पाणी तसेच आवश्यक ती बैठक व्यवस्था याचे नियोजन करण्यात आले होते.
शिवसेना वर्धापन दिनानिमित्त आयोजित या विधायक कार्यक्रमाला शिवसेना पुणेशहर प्रमुख संजय मोरे, उपशहर प्रमुख आनंद गोयल, पुणे शहर समन्वयक सुनील जाधव, वडगावशेरी समन्वयक शैलेंद्र मोरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना वडगावशेरी वैद्यकीय मदत कक्षाचे अध्यक्ष भूषण जाधव यांनी केले होते. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, पुणे महापालिका व प्रहार अपंग क्रांती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading