Friday, September 4, 2026
Latest NewsPUNE

Pune -बिबवेवाडी अप्पर मुख्य रस्त्यावर शिवशिल्पाचे लोकार्पण

पुणे: प्रभाग क्र. 37  बिबवेवाडी अप्पर मुख्य रस्त्यावरील चिंतामणी नगर चौकात उभारण्यात आलेल्या शिवशिल्पाचे लोकार्पण आमदार माधुरी मिसाळ आणि  भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी , नगरसेविका रुपाली धावडे, सुधीर धावडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व चिंतामणी  नगर येथील नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार माधुरी मिसाळ  म्हणाल्या, या चौकातून प्रत्येकाला जाताना   शिवशिल्पाचे  दर्शन घडणार आहे. प्रत्येकांनी शिवाजी महाराजांचे एक गुण तरी घेतले पाहिजे जगदीश मुळीक म्हणाले,   शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून मी येथे आलो  शिवसम्रज्या दिवशी प्रत्येक चौकात लोकार्पण केले पाहिजे. शिवसाम्राज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला पाहिजे शिवाजी महाराजांच्या काळात महिलांवर अत्याचार चोरी यासारख्या घटना व्हायच्या नाहीत या घटना आपल्या काळात व्हायला नाही पाहिजेत .
नगरसेवक रुपाली धाडवे म्हणाल्या,  प्रभागांमध्ये शिव शिल्प उभारावे अशी नागरिकांची मागणी होती,  पण आम्हाला जागा कुठे  भेटत नव्हती .आम्ही चिंतामणी नगर चौकात  शिवशिल्प उभारायचे ठरविले. आम्ही शिव साम्राज्य या दिवशी शिव शिल्प लोकार्पण करायचे ठरवले, प्रत्येक नागरिकांनी शिवाजी महाराजांचे गुण जोपासले पाहिजेत. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading