Thursday, September 3, 2026
BLOGLatest News

मोदीजी, हे वागणं बरं नव्हे…

मोदीजी आभाराचे बॅनरच काय, देशातील सर्व शैक्षणिक संस्था व विदयापीठात तुमचे पुतळे उभे करुयात का ?

देशातील सगळयाच प्रकारच्या केंद्रीय सरकारी आणि स्वायत्त संस्था या ना त्या कारणांनी पंतप्रधानाच्या मनमानी अादेशावर सुरु आहेत. त्यात शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण आणि सर्वोच्च मानले जाणारे विदयापीठ अनुदान आयोग तरी का मागे राहणार ?

मोदीजी, हे वागणं बरं नव्हे… प्रसिध्दीचा हव्यासाची हद्दच केलीय आता अापण. अहो निदान शैक्षणिक क्षेञ तरी सोडायचं ना ? बरं आम्ही काय म्हणतो- थोडंसं तरी योगदान द्या, तुमच्या अभिनंदनाचे बॅनरच काय तर प्रत्येक विदयापीठातील आवारात तुमचे पुतळे देखील उभारु पण अाधी हे करा –

1) शैक्षणिक क्षेञासाठी एकुण उत्पन्नाच्या 10% खर्चाची तरतूद करा.

2) देशात सर्वाधिक बेरोजगारी मागील 5 वर्षात (आपल्याच कार्यकाळात) वाढली, आपण दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. ते आधी पुर्ण करा.

3) देशातील तरुणांना उदयोजक बना म्हणुन सांगता तर स्टँड अप, स्टार्ट अप, मुद्रा लोन या योजना किती यशस्वी झाल्या ते कळवा आणि त्या कशा राबवता येतील त्याकडे लक्ष द्या.

4) उच्चशिक्षणात जगात पहिल्या 100 नामांकित विदयापीठात किती भारतीय विदयापीठांचा समावेश अाहे ते सांगा आणि शैक्षणिक गुणवत्ता सुधारणेसाठी मागील काही वर्षात काय प्रयत्न केले ते सांगा.

5) मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे केंद्रीय शिष्यवृत्ती योजनेतील बजेट वर्षानुवर्षे कमी का होत आहे ते सांगा.

6) अल्पसंख्याक, आदिवासी, दलित या प्रवर्गातील युवकांच्या उच्चशिक्षणाचा टक्का का वाढत नाही ते सांगा.

7) देशात संशोधन क्षेञासाठी किती खर्च करता ?

वरील गोष्टी करा अाणि मग तुम्हाला अादेश देखील काढायची गरज नाही, आम्ही तरुणच पुढे सरसावून तुमचे विदयापीठात पुतळे उभे करण्याची चळवळ उभी करु. न भुतो न भविष्यती असे पंतप्रधान लाभले याचे कौतुक सोहळे आम्ही गावागावात करु. तरुणांसाठी वेळ मिळाला तर एवढं कराच मोदीजी.

हे सर्व प्रश्न आत्ता विचारण्याचे कारण एकच की
काल देशातील सर्वाच्च असणाऱ्या विद्यापीठ अनुदान आयोगाने अादेश काढला – त्यात देशातील सर्व विद्यापीठांना कळवण्यात आले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अाभाराचे बॅनर विदयापीठ कँम्पस मध्ये लावावेत कारण त्यांनी 18 वर्षापुढील तरुणांना मोफत लसीकरणाचा उपक्रम सुरु केला आहे. त्याची डिझाईनिंग आणि मजकुर देखील माहीती व प्रसारण मंत्रालयाने पाठवला आहे. यात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवतो आहोत असा उल्लेख देखील यामध्ये करण्यात आलाय. सरकारी आणि स्वायत्त संस्थांना हातचे बाहुले बनवता बनवता आता UGC आणि विद्यापीठांनाही आपल्या खाजगी एजन्सीप्रमाणे राबवून घेणं हे खरंच निराशाजनक आहे आणि जगातील सर्वात मोठ्या म्हणवल्या जाणाऱ्या लोकशाहीला काळीमा फासण्यासारखे आहे.

कुलदीप आंबेकर
अध्यक्ष- स्टुडंट हेल्पींग हँड

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading