Pune – खडकवासला धरण साखळी क्षेत्रातील पाणीसाठयात तब्बल दोन टीएमसीची वाढ

पुणे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात गुरुवारी आणि शुक्रवारी या दोनच दिवशी जोरदार पाऊस झाला होता मागील 21 दिवस पाऊस पडल्याने
चारही धरणात मिळून 2 टी एम सिने जादा वाढ झाली आहे मात्र शनिवारपासून पावसाची ग ती
कमी होत गेलीय अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधिकारी विजय पाटील यांनी दिली.

मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता या चारही धरणात मिळून 8.96 टीएमसी अर्थात 27.25 टक्के पाणी साठा झाला. सोमवारी सकाळी सहा वाजता चारही धरणात 7. 72 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता .म्हणजे आज अखेर 1.420 टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे तसेच गेल्या सोमवारपासून पुणे शहर आणि परिसरातील पाणी योजनेसाठी सोडलेले ते एकूण सुमारे 2 टीएमसी ची वाढ झालेली दिसून येत असल्याचे पाटबंधारे आधिकारी विजय पाटील यांनी सांगितले.

मागील आठवडी टेमरघरला120 किलोमीटर पाऊस झाला होता तर वरसगावला 51 मिलिमीटर तर खडकवासला येथे 47 मिलिमीटर पाऊस झाला होता यानंतर शनिवार-रविवार पाऊस कमी होत गेला मंगळवारी दिवसभर ऊन होते अशीच परिस्थिती आज बुधवारी पण असणार आहे रविवारी सकाळी 6 वाजता चोवीस तासांमध्ये पडलेल्या पावसाची आकडेवारी बघितली असता पाऊस थांबल्याचे दिसत आहे खडकवासला येथे 1, पानशेत येथे 2, वरसगाव येथे 3, आणि टेमघर येथे 21 मिलिमीटर पाऊस झाला आहे अशी माहिती विजय पाटील यांनी दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: