नगरसेवक बाळा ओसवाल यांनी यांनी सुरू केली पंडित दीन दयाळ ई लर्निंग स्कूल
पुणे: बिबवेवाडी येथील नगरसेवक बाळा ओसवाल यांनी स्वतःच्या खर्चा तुन पंडित दीन दयाळ ई लर्निंग स्कूल सुरू केली आहे. सरकार मान्यता प्राप्त ही स्कूल आहे, पाहिली ते पाचवी पर्यंत स्कूलमध्ये शिक्षण घेता येणार आहे.
महेश सोसायटी येथे ही स्कूल उभारण्यात आली असून शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्या हस्ते या स्कूल चे उद्घाटन झाले स्कूलच्या उद्घाघाटनाच्या वेळी किरण कांबळे शिवसेना शाखाप्रमुख निरंजन कांबळे, मयूर जगताप व प्रभाग 37 मधील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच पहिली ते पाचवी ऍडमिशन घेणारे विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.
यावेळी बोलताना संजय मोरे म्हणाले, प्रभाग 37 मधील शिवसेनेचे नगरसेवक बाळा ओसवाल यांनी स्वतःच्या खर्चातून पंडित दिन दयाळ ई लर्निंग स्कूल सुरू केली त्यामुळे अप्पर सुपर इंदिरा नगर मधील मुलांना जवळच्या जवळ शाळेत जाता येणार आहे. नगरसेवक बाळा ओसवाल हे प्रभागात गरीब लोकांसाठी सारखे चांगलेच काम करत असतात, त्यांनी पंडित दीनदयाळ लर्निंग स्कूल चालू केल्यामुळे त्याचा प्रभागातील मुलांना लांब जावे लागणार नाही.
बाळा ओसवाल म्हणाले, आमच्या प्रभागात खूप गरजू मुले आहेत यंदा कोरोनामुळे लोकांची आर्थिक परिस्थिती खूप खराब झाली आहे काही मी व माझ्या सहकार्यामुळे ही स्कूल सुरू करू शकलो इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी शाळा शिकता येणार आहे . मी फक्त पाच हजार रुपये फी ठेवली आहे त्यामुळे आमच्या प्रभागातील विद्यार्थ्यांना जवळच्या स्कूलमध्ये शिकता येणार आहे स्कूलचे ऍडमिशन आम्ही आजपासून सुरू करत आहोत 29 जून ला ही स्कूल चालू होणार आहे असे बाळा ओसवाल यांनी सांगितले.
