fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRA

ऑक्सफॉम इंडिया संस्थेकडून झरी आरोग्य केंद्रास आठ लाखांचे साहित्य भेट

परभणी: जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण जनतेला आरोग्याची मदत मिळावी या हेतूने ऑक्सफॉम इंडिया या संस्थेने एका प्राथमिक आरोग्य केंद्राला पुरेसे वैद्यकिय सामान अंदाजे 8 लाख रुपये किंमतीचे जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांच्याकडे आज सुपूर्द केले.

ऑक्सफम इंडिया या सामाजिक संस्थेच्या तर्फे मिशन संजीवनी 2.0 अंतर्गत जिल्हयातील झरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास बुधवारी ऑक्सिजन सिलिंडर ( 40 Ltr capacity) – 08, ऑक्सिजन फ्लोमिटर -08, नेब्यूलायझर मशीन 15, सेमिफ्लोर बेड 5, पीपीई किट 100 ग्लोज ,एन -95 मास्क, फेस शिल्ड इत्यादी साहित्य प्रदान केले.

संस्थेने दिलेले साहित्य पाहून जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी विशेष कौतूक करुन संबंधित संस्थेच्या प्रतिनिधीच्या पाठीवर कौतूकाची थाप दिली. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, ऑक्सफॅम इंडियाचे आनंद पेडगावकर उपस्थित होते.

ग्रामीण जनतेला कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यांची जी धावपळ होते. ती थांबविण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला मदत मिळण्यासाठी ऑक्सफॉम इंडियातर्फे मिशन संजिवनीच्या माध्यमातून ऑक्सिजन सिलेंडर, मास्क, सॅनिटायझर, पाच बेड, हे सर्व वैद्यकिय साहित्य देत आहोत असे त्यांच्या प्रतिनिधीने सांगितले. ग्रामीण जनतेला वैद्यकिय आधार मिळावा हाच त्यामागचा हेतू आहे. गोरगरीब जनतेचा जो कोरोनामध्ये खर्च होतो तो अवाढव्य असून ग्रामीण भागातल्या सर्व भारतीय बांधवांना मदत मिळावी याच संकल्पनेच्या माध्यमातून पुर्ण साहित्य ऑक्सफॉम इंडियाकडून देण्यात येत आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading