Saturday, June 13, 2026
ENTERTAINMENTLatest NewsPUNE

दिग्दर्शक मिलिंद बाचल यांची कोविड वर आधारित ‘राईस ऑफ 2020’ शॉर्टफिल्म प्रदर्शित

पुणे : दिग्दर्शक मिलिंद बाचल हे नेहमीच समाजातील वास्तविक विषय आपल्या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर घेऊन येतात. यावेळीही त्यांनी कोरोनावर आधारित राईस ऑफ 2020 ही 13 मिनिटाची शॉर्ट फिल्म तयार केली. पहिली लाट येऊन गेली नाही तोवर दुसरी लाट आली. महाभयंकार दुसऱ्या लाटेत लाखो लोक मृत्युमुखी पडले. या सर्व प्रकाराला आपला बेजबाबदार पणाचा कारणीभूत होता हाच मुख्य विषय घेत नातेपुते ता. माळशिरस सोलापूर येथे मिलिंद बाचल यांनी या शॉर्ट फिल्मचे चित्रीकरण केले. 19 जूनला ही शॉर्ट फिल्म रिलीज झाली असून समाजातीतून फिल्मला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

नातेपुते येथील ओंकार मिसाळ यांनी ही कथा लिहिली असून याची निर्मिती देखील त्यांनीच केली आहे. तर पटकथा, दिग्दर्शन, छायाचित्रण, संकलन, कलाकारांची निवड आदी मिलिंद बाचल यांनी केले. यामध्ये प्रामुख्याने लहानांना जे समजतं ते थोरांना समजतं नाही, शिवाय व्यसनाधीनता आणि बेजबाबदारपणा मुळे कुटुंबावर झालेले वाईट परिणाम मुख्यत्व करून दाखविले आहेत. यामध्ये मुख्य लहान मुलीचे पात्र जुई तनपुरे हिने अगदी उत्तमरित्या साकारले असून सर्व क्षेत्रातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शिवाय श्रीकांत गायकवाड, सीमा तनपुरे, नारायण आवळे, साक्षी मिसाळ, तन्वीक लोखंडे, विकास अवघडे,विक्रम अवघडे, बापू लोखंडे, नाना सोरटे,माऊली वायदंडे, ओंकार मिसाळ यांनी उत्तमरित्या आपल्या भूमिका साकारल्या. याकामी ग्रामपंचायत नातेपुते व गावातील ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading