Pune – उद्यापासून 18 वर्षांवरील नागरिकांना मिळणार कोविशील्ड लस – महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे – केंद्र सरकारने आखलेल्या नव्या लसीकरण धोरणानुसार पुणे महापालिका हद्दीत कोरोना लसीकरण सुरु करण्यात येत असून लसीकरणाची ही मोहीम व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार आहे. यासाठी पुणे महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

महापौर मोहोळ म्हणाले, १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण होणे, हा आपल्या पुणे शहरासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. पुणे शहर लसीकरणाबाबतीत आघाडीवर तर आहेच, मात्र नव्या लसीकरण धोरणामुळे कोरोनाविरुद्धच्या लढ्याला मोठे बळ मिळेल. शहरातील १८ वर्षांवरील नागरिकांची संख्या आणि व्यापकता लक्षात घेऊन महापालिकेने लसीकरणाचे नियोजन केले आहे’.

१८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘पहिल्या दिवशी आपण ५३ केंद्रांवर लसीकरण करत असून प्रत्येक केंद्रांवर १०० कोविशील्ड लस उपलब्ध करुन दिल्या आहेत. प्रत्येक केंद्रांवर ७० टक्के डोस हे ऑनलाईन अपॉईंटमेंट बुकिंग केलेल्या नागरिकांना तर ३० टक्के डोस हे ऑन स्पॉट नोंदणी करुन उपलब्ध करून दिले आहेत. ऑनलाईन नोंदणी बुधवारी सकाळी ८ वाजता सुरु होणार आहे’.

Leave a Reply

%d bloggers like this: