Friday, May 29, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘द फॅमिली मॅन 2’ ठरली जगातील चौथी सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरीज

अभिनेता मनोज बाजपेयी,  शरिब हाश्मी आणि अभिनेत्री समांथा अक्किनेनी यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘द फॅमिली मॅन 2’ ही वेबसीरीज तूफान गाजत आहे. या वेबसीरीजने जागतिक पातळीवर एक नवा विक्रम नोंदवला आहे. ‘द फॅमिली मॅन 2’ ही जगभरातील लोकप्रिय सीरीजमध्ये चौथ्या क्रमांकाची सीरीज बनली आहे. या सीरीजला आयएमडीबीवर 10 पैकी 8.8 स्टार देण्यात आले आहेत. या रेटिंगसह, ‘द फॅमिली मॅन 2’ जगातील सर्वोत्तम 5 वेब सीरीजच्या यादीत सामील झाली आहे.

या अनोख्या विक्रमामुळे या सीरीजने ‘फ्रेंड्स’, ‘ग्रेज अनोटोमी’ यासारख्या मालिकांना मागे टाकले आहे. तर ‘लोकी’, ‘स्वीट टूथ’ आणि ‘मियर ऑफ ईस्टटाउन’ या फॅमिली मॅनपेक्षा पुढे आहेत.

एका कॉमन मॅनची कहाणी त्यात ट्विस्ट आणि सस्पेन्स यामुळे ही वेबसीरीज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. समीक्षकांच्या पातळीवरही ही चांगलीच नावाजली गेली. अभिनेता मनोज बायपेजी यांनी स्वत: चाहत्यांना या खास विक्रमाची माहिती दिली आहे. या अभिनेत्याने ट्विटद्वारे चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. त्याने लिहिले की, ‘द फॅमिली मॅन 2′ हा जगातील चौथा सर्वाधिक लोकप्रिय शो बनला आहे.’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading