लवकरच … ‘बिग बॉस मराठी- 3’

तब्बल दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ‘बिग बॉस मराठी -3’ प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अभिनेते-निर्माते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी इन्स्टाग्राम पोस्ट करीत ही घोषणा केली आहे. ‘बिग बॉस मराठी – 3 ’चा प्रोमो शेअर करत “त्याच्यासोबत मी परत येतोय… लवकरच … तुम्ही तयार राहा…” असे मांजरेकरांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे. या पोस्टमुळे या सीजनचे सूत्रसंचालन महेश मांजरेकरांच्या आवाजात ऐकायला मिळणार हे स्पष्ट आहे.

करोंनाच्या प्रादुर्भावामुळे चित्रीकरण करताना कोरोनाविषयक नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे गेल्या वर्षी ‘बिग बॉस मराठी’चा नवा सिझन आलाच नाही. मात्र हिंदीत सलमान खानचा बिग बॉस -14 सर्व नियम पाळून पार पडला. त्यामुळे प्रेक्षकांना मराठी पर्वाचीही उत्सुकता लागली होती. अखेर दोन वर्षांच्या कालावधीनंतर ही उत्सुकता आता संपणार आहे. बिग बॉसच्या घरात जवळपास 15 स्पर्धक रात्रंदिवस एकत्र राहतात. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धक आणि निर्मात्यांना अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग अशा नियमांचे पालन कसे होणार, हे पहावे लागेल.

Leave a Reply

%d bloggers like this: