सरनाईक यांच्याप्रमाणेच अनेकांची इच्छा – देवेंद्र फडणवीस
मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपशी जुळवून घेण्याची विनंती केली आहे. यावर भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरनाईक यांच्याप्रमाणेच अनेकांच्या इच्छा आहे परंतु हा मुद्दा भाजपचा नसून शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा आहे. आम्ही जनतेची काम करत आहोत यामुळे येणाऱ्या निवडणूकींमध्ये भाजप स्वबळावर येईस असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, सरनाईकांप्रमाणे अशी अनेकांची इच्छा असू शकते परंतु याबाबत स्पष्ट मत आहे की, हा शिवसेनेचे अंतर्गत मुद्दा आहे. त्यांनी त्यांच्या पक्षप्रमुखांना पत्र लिहिले आहे. त्यांच्या प्रमुखांनी त्यांना काय सांगायचं हे ते सांगतील. भाजपचं पक्क आहे आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत. जनतेची काम करणं आणि जनतेची काम करत असल्यामुळे आम्हाला विश्वास आहे की, भाजपने जनतेच्या मनामध्ये प्रतिमा तयार केली आहे. यामुळे येत्या काळात आम्ही स्वबळावर येऊ असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेसनंतर आता शिवसेनेकडून स्वबळाचा नारा दिला असा सवाल फडणवीस यांना करण्यता आला होता. भाजप स्वबळावर लढत आहे. आता महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांचा प्रश्न आहे की, कोणी कोणाला जोडे मारायचे आहेत कोणी कोणाला हार घालायचे हा निर्णय त्यांना करायचा आहे. आमची बांधिलकी जनतेशी आहे त्यामुळे असच भाजप काम करत राहील असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
