Thursday, September 3, 2026
Latest NewsPUNE

‘कर्जदार व सरकार’ला फसवल्या प्रकरणी ‘कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स कंपनी’ उच्च स्तरीय चौकशी करा…’ – संभाजी ब्रिगेड

पुणे – कॅप्री गलोबल हाऊसिंग फायनान्स फायनान्स कंपनीच्या वतीने शेकडो खातेदारांना कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये कर्जदारांची फसवणूक करून सदर कर्जदार नागरिकांना कोट्यवधी रुपयांची फसवणूक झालेली आहे. पंतप्रधान आवास योजना सारख्या महत्त्वाच्या योजना मध्ये फसवणूक करून लाखो रुपयांचा सदर कंपनीने घोटाळा केलेला आहे. यामध्ये केंद्र सरकार व राज्य सरकारच्या नियम व अटी शर्तींचा भंग केलेला आहे. तरी सर्वसामान्य नागरिकांना फसवल्या प्रकरणी आपल्या विरोधात ‘संभाजी ब्रिगेड, पुणे शहराच्या वतीने आज शिवश्री. अविनाश मोहिते महानगर अध्यक्ष, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी आंदोलन करण्यात आले.

ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड च्या वतीने केलेला घोटाळा…
१) पंतप्रधान आवास योजना फसवणूक.
२) कर्जदारांची मान्यता घेता कर्जाची मुदत वाढवणे.
३) विमा योजना अफरातफर.
४) कर्जाचा हप्ता मध्ये केलेली वाढ…

यासारख्या विषयामुळे पुणे शहरासह महाराष्ट्रातील हजारो लोकांची फसवणूक झाल्याचं निदर्शनास आलेले आहे. हा विषय अत्यंत गंभीर असून आर्थिक फसवणुकीचा आहे. त्याविरोधात आम्ही पुणे, मुंबई व महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी अतिशय तीव्र स्वरूपात ‘आंदोलन’ करणार आहोत. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक व बँकेचे सभासद उपस्थित होते, बँकेनी केलेल्या कर्जदारांची फसवणुकीच्या निषेधार्थ धरणें आंदोलन झाले, आठ दिवसांचा बँकेला अल्टिमेटम देण्यात आला… आठ दिवसात निर्णय घ्या. मागण्या मान्य न झाल्यास संभाजी ब्रिगेड तर्फे आक्रोश आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला, यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून संभाजी ब्रिगेड पुणे शहराध्यक्ष शिवश्री अविनाश मोहिते, पुणे शहर कार्याध्यक्ष शिवश्री संदीप कारेकर, पुणे शहर कार्याध्यक्ष शिवश्री नितीन वाघिरे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री महादेव मातेरे, पुणे शहर व्यापारी आघाडी अध्यक्ष शिवश्री अजय माने पर्वती विधानसभेचे अध्यक्ष कुमार पवार व इतर संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवाजीराव भोसले बँक रायसोनी बँक बँकेतल्या घोटाळ्या सारखाच या कॅप्री गलोबल हाऊसिंग फायनान्स कंपनी’ चा घोटाळा आहे. म्हणून या सर्व कर्ज प्रकरणाची व याबाबत सविस्तर राज्य सरकारलाही या प्रकरणी दखल घेण्यासाठी भाग पाडणार आहोत. ‘कर्जदार व सरकार’ला फसवल्या प्रकरणी ‘कॅप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स कंपनी’ उच्च स्तरीय चौकशी करावी…’ अशी संभाजी ब्रिगेड’ची मागणी आहे.

यावेळी पत्रकार परिषदेस शहराध्यक्ष शिवश्री. अविनाश भाऊ मोहिते, महाराष्ट्र प्रदेश संघटक शिवश्री. संतोष शिंदे, शिवश्री. नितीन वाघिरे कार्याध्यक्ष पुणे शहर, शिवश्री संदीप कारेकर सचिव पुणे शहर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष महादेव मातेरे, खडकवासला विधानसभा उपाध्यक्ष सनी देशमुख, व्यापारी आघाडी अध्यक्ष अजय माने, पुणे शहर संघटक सचिन गायकवाड आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading