महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळामार्फत राज्यातील 1 ली ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके विक्रीसाठी उपलब्ध

पुणे – कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना राज्यभरातील निर्बंध शिथिल केले जात आहेत. राज्यातील शाळाही ऑनलाईन स्वरूपात सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळामार्फत राज्यातील पहिली ते बारावीच्या सर्व माध्यमांतील विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकेही विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. 

पहिली ते आठवीची पाठ्यपुस्तके दहा भाषांच्या माध्यमात आणि नववी व दहावीची पाठ्यपुस्तके आठ भाषांच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांसाठी मिळणार आहेत. बालभारतीचे संचालक दिनकर पाटील म्हणाले, ‘कोरोना संकटामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या हेतूने बालभारतीने वेळेवर सर्व पाठ्यपु्स्तके तयार केली आहेत. ही सर्व पाठ्यपुस्तके बालभारतीच्या विभागीय भांडारांत खुल्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनाही पाठ्यपुस्तके उपलब्ध होण्यासाठी मंडळाच्या सर्व विभागीय भांडारांत किरकोळ विक्री सुरू ठेवण्यात आली असल्याची माहितीही पाटील यांनी दिली. ही पुस्तके पुणे, नागपूर., औरंगाबाद या विभागासाठी उपलब्ध आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: