Saturday, May 30, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

21 जून पासून सर्व खासगी क्लासेस सुरू करण्याचा महाराष्ट्र राज्य खासगी क्लासेस कृती समितीचा निर्णय

पुणे – कोरोनाच्या पार्श्वभूमी वर पॉझिटिव्हिटी दरचे निकष लक्षात घेता राज्य सरकारने पुण्यासह काही जिल्ह्यात 50 टक्के उपस्थितीत खाजगी क्लासेस सुरू करण्याची मुभा दिली आहे. मात्र सरसकट राज्यभरात खाजगी क्लासेस सुरू न झाल्याने खाजगी क्लासेस वाल्यांची आर्थिक परवड होत आहे, त्यामुळे आरोग्याचे सर्व नियम पाळून 21 जून पासून महाराष्ट्रातील सर्व खाजगी क्लासेस सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य खासगी क्लासेस  कृती समितीने घेतला आहे.

राज्यातील विविध भागातील संघटना एकत्रित येत महाराष्ट्र कोचिंग क्लासेस कृती समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने आज पुण्यात मागच्या मार्च महिन्यापासून खाजगी कोचिंग क्लास बंद असल्यामुळे क्लासेस समोर निर्माण झालेल्या अनेक अडचणी मांडल्या यावेळी कृती समितीचे विजय पवार, दिलीप मेहेंदळे, अक्षय देशमुख, दिलीप बोत्रे, संतोष वासकर आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली चौदा महिने राज्यातील जवळपास 1 लाख खाजगी कोचिंग क्लासेस संपूर्णतः बंद आहेत. त्यात पुण्यातील 17हजार क्लासेसचा समावेश आहे, त्यामुळे क्लास चालक तेथील शिक्षक व कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. शिक्षकांचे पगार, जागेचे भाडे, दैनंदिन खर्च यांचे आर्थिक चक्र कोलमडलेले आहे. या सर्व स्थितीचा विचार करून येत्या 21  जून पासून महाराष्ट्रातील खाजगी क्लासेस सुरू करीत आहोत त्यास शासनाने सहकार्य करावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य खासगी क्लासेस कृती समितीने केले आहे.

महाराष्ट्र राज्य खासगी क्लासेस कृती समितीच्या मागण्या
1) खाजगी क्लासेस ना शासनाने पॅकेज जाहीर करावे
2) शिक्षकांचे पगार द्यावेत
3) क्लासेस साठी जीएसटीची मर्यादा कमी करावी
4) जागेच्या भाड्याचा खर्च द्यावा

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading