fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

राज्याचे दोन मंत्री मराठा आंदोलनात सहभागी होणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे – भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनां आंदोलन ऐवजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आवाहन केले होते. आमचा आंदोलनाला विरोध नाही मात्र, कोरोना संसर्ग होणार नाही याची खबरदारी घेऊन आंदोलन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. ते पुण्यात बोलत होते. कोल्हापुरातून निघणाऱ्या उद्याच्या मुक आंदोलनामध्ये राज्याच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्री सहभागी होतील अशी माहितीही यावेळी अजित पवार यांनी दिली आहे.

आज सकाळीच कोल्हापूरमध्ये छत्रपती संभाजीराजे यांनी उद्या होणाऱ्या मुक आंदोलना संदर्भात बैठक घेतली. यावेळी उद्या शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.या पार्श्वभूमीवर अजित पवार बोलत होते. कोल्हापूर जिल्‍ह्यातील कोरोना स्‍थितीचा आढावा घेण्यासाठी काल दौऱ्यावर आले असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्‍तव्याचा समाचार घेतला.कोल्हापुरातून निघणाऱ्या उद्याच्या मूक आंदोलनामध्ये राज्याच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्री सहभागी होतील अशी माहितीही यावेळी अजित पवार यांनी दिली आहे.हेही वाचा- मराठा आरक्षण : कोल्हापुरात उद्यापासून आंदोलन; कसं असेल स्वरुप?पवार म्हणाले, राज्याच्या हातातील प्रश्न सोडवायची मुख्यमंत्री मंडळाची तयारी आहे. मराठा, ओबीसी आरक्षणावर विरोधकांची दुटप्पी भूमिका आहे. तीन पक्षांचं सत्तेत आलेले सरकार विरोधकांची अजूनही पोटदुखीच आहे. सोनिया गांधी, पवार, ठाकरेंचा पाठिंबा असेपर्यंत आघाडीला धोका नाही. विरोधकांची पोटदुखी अद्याप थांबलेली नाही. आमचा आंदोलनाला विरोध नाही असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading