सलोनी भरम, खिराज फुलावत नृत्य स्पर्धेत प्रथम
पुणे : स्वारद फाऊंडेशनच्यावतीने ऑनलाईन नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शास्त्रीय आणि पाश्चात्य नृत्यप्रकारात ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सलोनी भरम, आणोली धुमाळ, सलोनी वाशीवले, खिराज फुलावत यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक पटकाविला.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त ऑनलाईन नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सुरज नृत्य अकादमीच्या वतीने नृत्यपरिक्षण करण्यात आले. सबज्युनियर, ज्युनियर,सिनियर आणि खुल्या गटात ही स्पर्धा घेण्यात आली. विजेत्यांना बक्षिसे घरपोच देण्यात आले.
स्वाती मोहोळ म्हणाल्या, लॉकडाऊनमुळे मुले घरी बसून कंटाळली आहेत. त्यामुळे त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ऑनलाईन नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धकांनी स्पर्धेला भरभरुन प्रतिसाद दिला.
एक घास आपुलकीचा या उपक्रमांतर्गत स्वारद फाऊंडेशन तर्फे श्री शंकर महाराज मंदिर, धनकवडी, बालाजी नगर परिसरात गरजूंना अन्नाचे वाटप केले. गेल्या ६ दिवसांत सुतारदरा येथे १०० झाड़े लावण्यात आले. तसेच म्हातोबा नगर येथे वुक्षारोपण करण्यात आले. स्वारद फाऊंडेशन च्या संस्थापिका स्वाती मोहोळ यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला.
