Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मराठा आरक्षण – कोल्हापूरच्या मुक मोर्चात अॅड. प्रकाश आंबेडकर सहभागी होणार

कोल्हापूर – खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली उद्या 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी मराठा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. ३६ जिल्ह्यांमध्ये निघणारा हा पहिला मराठा मोर्चा आहे. नुकतच  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या आंदोलनात कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील तसेच हसन मुश्रीफ सहभागी होणार असल्याचे सांगितले, आणि आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील या आंदोलनाला प्रतिसाद दिला आहे. उद्याच्या कोल्हापुरातील मराठा मोर्चात प्रकाश आंबेडकरही सहभागी होणार आहेत असल्याची माहिती मिळत आहे.  वंचित बहुजन आघाडीने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर जर एकत्र येऊ शकतात, तर मी आणि प्रकाश आंबेडकर का नाही 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजेंनी सर्वपक्षीय नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्याचाच भाग म्हणून संभाजीराजे यांनी 29 मे रोजी पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची देखील भेट घेतली होती. त्यावेळी अनेक दिवसांपासून मला प्रकाश आंबेडकर यांची भेट घ्यायची होती. शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा मला लाभला आहे. शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर जर एकत्र येऊ शकतात, तर मी आणि प्रकाश आंबेडकर का एकत्र येऊ शकत नाहीत? असं संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं होतं.

संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर…   

महाराष्ट्राच्या राजकारणात शिळेपणा आला आहे. तो ताजेपणा आणायचा असेल, तर संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर तो येऊ शकतो, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.

कोल्हापुरातील शाहू समाधी स्थळाच्या ठिकाणी पहिला मराठा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे, त्यामुळे कोल्हापुरात आता उद्याच्या मूक मोर्च्याची जय्यत तयारी सुरु आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading