Tuesday, June 16, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

प. बंगाल – भाजपला झटका! मुकुल रॉय यांची मुलासह तृणमूल मध्ये घरवापसी

कोलकाता – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपला आणखी जोरदार झटका बसला आहे. भाजपाचे मोठे नेते मुकुल रॉय आपला मुलगा शुभ्रांशु यांच्यासह तृणमूल कॉंग्रेसमध्ये परतले आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत त्यांनी तृणमूल कॉँग्रेस मध्ये  प्रवेश केला आहे.

या संदर्भात ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेतली. मुकुल रॉय देखील त्यांच्यासह उपस्थित होते. ममता म्हणाल्या की, भाजपमध्ये बरेच शोषण होत आहे. तिथे राहणे लोकांना अवघड जात आहे. भाजपा हा सर्वसामान्यांचा पक्ष नाही.

मुकुल रॉय यांनी २०१७ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीच्या अनेक नेत्यांचा तोडण्याचा त्यांचा हात असल्याचे म्हटले जात होते. पण आता त्यांचे पक्षातून बाहेर पडणे हा भाजपासाठी मोठा धक्का असणार आहे. सध्या याविषयी कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, परंतु प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार मुकुल रॉय दुपारी तीन वाजता टीएमसीमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. या दरम्यान, सीएम ममता बॅनर्जी स्वत: हजर असतील. पश्चिम बंगालमधील निवडणुकांचे निकाल अनुकूल नसल्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. दुसरीकडे, टीएमसीचा असा दावा आहे की, भाजपचे ३५ हून अधिक नेते संपर्कात आहेत आणि त्यांना TMC मध्ये पुन्हा सहभागी व्हायचे आहे. टीएमसीमध्ये मुकुल रॉय यांची घरवापसी म्हणजे भाजपाला धक्कादायक ठरणार असून हा निर्णय बंगालमधील त्यांच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading