Thursday, September 3, 2026
ENTERTAINMENT

किरण कुमावत घेऊन येणार ‘लॉकडाऊन लग्न’

व्यवसायिक क्षेत्रात आपले नाव उंचावर घेऊन जाणारे निर्माते किरण कुमावत यांनी ‘डॉक्टर डॉक्टर’ चित्रपटाच्या निर्मितीतून सिनेसृष्टीत पाऊल टाकले. लहानवयापासून चित्रपटसृष्टीत आपले नाव असावे वा आपण काम करावे अशी प्रबळ इच्छा मनाशी बाळगून त्यांनी सिनेसृष्टीची स्वप्ने रंगविली. अभिनय क्षेत्रात आपणही सहकलाकाराची भूमिका साकारावी असे किरण कुमावत याना वाटत होते अशी संधी एखाद्या चित्रपटात मिळाल्यास ते या संधीचे नक्कीच सोने करतील. निर्मिती क्षेत्रात एका यशस्वी चित्रपटाच्या निर्मितीनंतर त्यांच्या मनात गोडी निर्माण होत गेली आणि त्यांनी ‘लॉकडाऊन लग्न’ या दुसऱ्या चित्रपटाची निर्मिती करण्याचे ठरविले. ‘लॉकडाऊन लग्न’ या चित्रपटाचा विषय हाताळण्याचे कारण म्हणजे सध्याच्या महागाईत थाटामाटात लग्न न करता साधेपणाने महागाईचा आणि परिस्थितीचा विचार करता लग्नसोहळा उरकून घेणे, हा मुद्दा पटल्याने त्यांनी चित्रपटाच्या निर्मितीस होकार दिला.

नवकलाकारांना, बॅकस्टेज काम करणाऱ्या नवीन लोकांना संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी एक मार्ग मोकळा करून देणे हा एकमेव उद्देश हाताशी धरून त्यांनी दोन्ही चित्रपटांची केली. निर्माता म्हणून सिनेसृष्टीत येण्यासाठी आयुष्यात काही तरी मोठे ध्येय प्राप्त करून दाखविण्याची इच्छा त्यांना प्रेरणा देत होती, ध्येयापर्यंत पोहोचण्यामध्ये अनेक खाचखळगे त्यांना पार करावे लागले, दरम्यान त्यांना अनेक माणसांचे सहकार्य लागले. निर्माता सागर पाठक आणि सहजोडीला अभिनेता, निर्माता अमोल कागणे यांच्या मदतीने त्यांनी चित्रपटसृष्टीत आपली कमान उभी केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading