Tuesday, June 16, 2026
PUNE

नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप

पुणे – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त कमला नेहरू हॉस्पिटल मंगळवार पेठ येथे रुग्णांना फळ वाटप करण्याचा कार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका सुजाता शेट्टी यांच्या वतीने करण्यात आले होते. मेल सर्जिकल, फीमेल मेडिकल, फीमेल सर्जिकल, मेल मेडिकल, फिजिओथेरपी डिपारमेंट येथील ३५० रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.  

फळ वाटप कार्यक्रम काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते शामराव अर्जुनराव पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या फळ वाटप कार्यक्रमाबरोबरच कमला नेहरू रूग्णालय या ठिकाणी असलेले समस्त कर्मचारी स्वच्छता कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांचा देखील सत्कार करण्यात आला. तसेच पुणे शहरातील पूर्व भागामध्ये कमला नेहरू रुग्णालय येथे काम चालू असलेले स्व.मातोश्री पद्मावती कृष्णा शेट्टी ICU केंद्राची पाहणी करण्यात आली. या प्रसंगी माजी स्थायी समिती अध्यक्ष सदानंद कृष्णा शेट्टी, कमला नेहरू हॉस्पिटलच्या सुप्रीडेन्ट लता त्रिंबके, असिस्टंट सुप्रीडेन्ट मंदार नागमोडे, रुग्णालयाचे सचिव श्रीकृष्णा सकट, इक्बाल शेख, सतीश चव्हाण, मंगेश भरत साखरे, सुलतान शेख, अशोकराव चव्हाण, नूरुद्दीन अन्सारी, इक्बाल शेख, अक्षय गायकवाड, राजू शेख, मुमताज शेख, वसीम शेख, अमर पवार, सचिन शेंडगे, राहुल चव्हाण तसेच अश्विनी मित्र मंडळ, सदानंद शेट्टी मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading