शिवाजी कोथमिरे यांची खाटीक समाज अध्यक्षपदी निवड
पुणे : शिवाजी कोथमिरे यांची अखिल भारतीय खाटीक समाज या संघटनेच्या पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुणे शहर महिला आघाडीच्या अध्यक्षपदी माधुरी निकुडे यांची नियुक्ती करण्यात आली.
मावळते अध्यक्ष संजय घोलप यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. संघटनेच्या सरचिटणीसपदी विक्रांत कांबळे, उपाध्यक्षपदी अविनाश जाधव, वरिष्ठ उपाध्यक्षपदी धनंजय गाढवे, मुख्य संघटक म्हणून अनिल घोडके यांची निवड करण्यात आली आहे. शिवाजी कोथमिरे हे मागील अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.
पुणे शहर महिला आघाडीची देखील नियुक्ती करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी माधुरी निकुडे, सरचिटणीसपदी सीमा घोणे, उपाध्यक्षपदी सरस्वती पवार, शुभदा कांबळे, डॉ. माधुरी इंगोले, गायत्री घोणे, अर्चना कांबळे, मोहिनी गाढवे, मीना इंगोले यांची देखील यावेळी विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली. पुणे शहर युवा प्रकोष्ठ अध्यक्ष सिध्देश कांबळे, उपाध्यक्ष हर्षल कोथमिरे यांची निवड झाली आहे.
