Saturday, May 30, 2026
PUNE

पडद्यामागील कलाकार-तंत्रज्ञांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप

पुणे : रोटरी क्लब ऑफ हिलसाईड आणि भरत नाट्य संशोधन मंदिराच्या कलावंतांतर्फे पुण्यातील विविध नाट्यगृहांमधील पडद्यामागील कलाकार व तंत्रज्ञांना आज जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.

कोरोनामुळे गेल्या सव्वावर्षापासून सर्व नाट्यगृहांचे पडदे उघडले गेले नसल्याने पडद्यामागील कलाकार-तंत्रज्ञांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कलाकार-तंत्रज्ञांची रोजच्या जगण्यासाठी होणारी धडपड-समस्या जाणून घेऊन रोटरी क्लब ऑफ हिलसाईड आणि भरत नाट्य संशोधन मंदिरातील कलावंतांनी जवळपास 40 तंत्रज्ञ-कलाकारांना मदतीचा हात दिला आहे. भरत नाट्य संशोधन मंदिरबालगंवर्ध रंगमंदिरयशवंतराव चव्हाण नाट्यगृहटिळक स्मारक मंदिरातील पडद्यामागील कलाकार-तंत्रज्ञांचा यात समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करून प्रातिनिधीक स्वरूपात साहित्याचे वाटप करण्यात आले.

जीवनावश्यक साहित्याचे वाटप रोटरी डिस्ट्रिक्ट 3131च्या भावी प्रांतपाल मंजू फडकेभरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष आनंद पानसेविश्वस्त पांडुरंग मुखडेकार्याध्यक्ष अभय जबडेसंजय डोळेरोटरीच्या खजिनदार आदिती रहाणेकार्यवाह चंद्रशेखर महामुनीज्येष्ठ कलावंत शरद गोखले यांच्या पत्नी नंदाताई गोखलेसुप्रिया गोसावीजयसिंघानी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. तसेच एमएएसटी-पीडीसी टिम मॅस्टेक आणि मित्र परिवारातर्फे अविनाश ओगले आणि उदय पाळंदे यांनी कलाकार-तंत्रज्ञांना आर्थिक सहाय्य केले.

मंजू फडके म्हणाल्याकोरोनामुळे सर्व क्षेत्रांवर संकट आले आहे. रोटरीतर्फे प्रत्येक स्तरावर मदतीचा वाटा उचलला जात आहे. अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत असला तरी प्रत्येक जण आपापल्या परिने इतरांना मदतीचा हात देत आहे. कोरोनामुळे आपल्यासमोर संकटे उभी राहिली असली तरी या काळाने आपल्याला माणुसकीही शिकविली. प्रत्येकाने आपल्या कुवतीनुसार गरजूंना मदत करणे आवश्यक आहे.

आनंद पानसे म्हणालेसमस्येच्या काळात रोटरी क्लबचा समाजासाठी मदत कार्यात कायम पुढाकार असतो. रोटरीमार्फत विविध स्तरांवर मदत कार्य सुरूच असते. रोटरीच्या या समाजोपयोगी उपक्रमांबद्दल नितांत आदर आहे.

भरत नाट्य संशोधन मंदिरातील कलाकार आणि रोटरी क्लब ऑफ हिलसाईडच्या उपक्रमांची माहिती अभय जबडे यांनी प्रास्ताविकात दिली. भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम सुरू राहणार असल्याचे अभय जबडे यांनी नमुद केले.

जीवनावश्यक साहित्याबरोबरच कलाकार-तंत्रज्ञांची आर्थिक अडचण दूर करण्यासाठी रोख निधी दिला असल्याचे उदय पाळंदे यांनी या वेळी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय डोळे यांनी केले तर आभार अविनाश ओगले यांनी व्यक्त केले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading