Thursday, September 3, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

Pune – प्रत्येक विभागात महापालिकेचे सत्ताधारी अपयशी – रुपाली चाकणकर

पुणे — शहरातील रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी , कुंभकर्णाप्रमाणे झोपलेल्या सत्ताधारी भाजपला जागे करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी पालिकेतील सत्ताधारी भाजप प्रत्येक विभागात अपयशी ठरल्याचा आरोप महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केला.

पुणे महानगरपालिकेसमोर झालेल्या या आंदोलनात रुपाली चाकणकर यांच्यासह महानगर पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सहभागी झाले होते.

चाकणकर म्हणाल्या, ऐतिहासिक व सांस्कृतिक राजधानी असलेल्या या पुणे शहरात यापूर्वी विकासकामे  नियोजनबद्धपणे केले जात परंतु जेव्हा पासून हे नाकर्ते भाजप सत्तेवर आले अगोदर रस्ता बनवतात मग पाईपलाईन खोदतात, कुठल्याही विभागांत समनव्य राहिलेला नाही यांचा समन्वय फक्त टक्केवारी मध्येच दिसून येतो.

हीच आहे का भाजपची स्मार्ट सिटी? होर्डिंग्ज जितके चांगले रंगवतात तितके चांगले रस्ते का नाहीत? किती दिवस टॅक्स रुपी गोळा झालेला नागरिकांचा पैसा खड्डड्यात घालणार.

रस्ते खोदतांना त्या कामासाठी तो काम किती दिवसांत पूर्ण करणार याचं कुठल्याही प्रकारचे नियोजन नाही,रस्ता खोदून ठेवला की ठेकेदाराची यंत्रणा ८-८ दिवस फिरकत सुद्धा नाही , या काळात जर अपघात झाले तर याला कोण जबाबदार.

इतिहास आहे या पुणे शहराचा पावसाळ्यात इथे असणारे ओढे नाले कधीही तुंबले नाही, गेल्या वर्षी आंबील ओढ्यालगतच्या भागात जवळपास एक मजला पाण्याखाली गेला,कित्येक संसार वाहून गेले, काही जीवितहानी देखील झाली …
हे सगळं कुणामुळे? का केली नाही नालेसफाई?ही जबाबदारी कुणाची? अजून किती हाल करणार आहात पुणेकरांचे?प्रत्येक विभागात महापालिकेचे अपयश दिसून येत आहेत.महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना जनतेची काळजी आहे की ठेकेदारांची ? हे त्यांनी एकदा पुणेकरांना सांगावे.

येत्या काही दिवसांत जर सत्ताधारी भाजपने पुणेकरांची या त्रासातून मुक्तता केली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भविष्यात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार असल्याचेही चाकणकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading