ऑफलाइन शिक्षणाप्रमाणेच ऑनलाइन शिक्षण देखील प्रभावी
बारामती- शैक्षणिक वर्ष २०१९-२० आणि कोविडनंतरच्या वर्ष २०२० दरम्यान २०,००० विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीवरील प्रायोगिक विश्लेषणामधून निदर्शनास आले आहे की, ऑफलाइन शिक्षणाप्रमाणेच ऑनलाइन शिक्षण देखील प्रभावी आहे. एडटेक (एज्युटेक) कंपनी लीडने केलेल्या विश्लेषणामधून निदर्शनास येते की, ऑनलाइन क्लासेसदरम्यान ८० टक्क्यांहून अधिक उपस्थिती दाखवलेल्या विद्यार्थ्यांनी नियमितपणे उपस्थित नसलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत ४५ टक्के अधिक गुण प्राप्त केले.
मार्च २०२० मध्ये शाळा बंद झाल्यानंतर भारतभरात उपयोग आणण्यात आलेल्या न्यू नॉर्मल ऑनलाइन क्लासरूम्समध्ये अध्ययन होण्याबाबत अनेक पालकांनी भिती व्यक्त केली, हे या सर्वेक्षणामधून निदर्शनास येते.
शैक्षणिक वर्ष (एवाय) २०१९-२०२० आणि एवाय २०२०-२०२१ साठी वर्षाच्या मध्यकाळात व वर्षाखेर करण्यात आलेल्या मूल्यांकनामधून निदर्शनास येते की, ऑनलाइन शिक्षणाने ऑफलाइनप्रमाणेच भाषा ओघ व उपस्थिती राखली आहे.
इंग्रजी व गणित या महत्त्वाच्या विषयांसंदर्भात एवाय १९-२० साठी अनुक्रमे ७९ टक्के व ७७ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना एवाय २०-२१ साठी दोन्ही विषयांमध्ये ७५ टक्के गुण मिळाले. ही पद्धत सहामाही परीक्षांदरम्यान, तसेच पूर्व-प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक इयत्तांमध्ये दिसून आली, ज्यामधून दिसून येते की तंत्रज्ञानाचा योग्य वापर, शिक्षकांचे प्रशिक्षण आणि उत्तमरित्या तयार करण्यात आलेला अभ्यासक्रम शाळा सुरक्षितपणे पुन्हा सुरू होईपर्यंत मुलांना दर्जेदार शिक्षण देऊ शकतात.
या निष्पत्तींनी पालकांना मोठा दिलासा दिला आहे. गेल्या वर्षी लीडने केलेल्या ५,००० पालकांच्या सर्वेक्षणामधून निदर्शनास आले की, ८५ टक्के पालकांनी त्यांच्या मुलांच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली होती.
हा डेटा सर्वाधिक उपस्थिती, शैक्षणिक कामगिरी व शालेय फीज यामधील संबंध देखील निदर्शनास आणतो. पालक अचानक दीर्घकाळापर्यंत शिक्षणामध्ये आलेल्या व्यत्ययानंतर देखील मिळत असलेल्या शिक्षणाबाबत समाधानी असल्याचे दिसण्यात आले.
लीड स्कूलचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुमीत मेहता म्हणाले, ”या निष्पत्तींमधून आमचा दीर्घकालीन विश्वास सार्थ ठरतो, तो म्हणजे ऑनलाइन असो वा ऑफलाइन तंत्रज्ञान विनाव्यत्यय शिक्षण देऊ शकते. आमच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या कामगिरीमधून सिद्ध झाले आहे की, शाळांनी शिक्षणामधील सकारात्मक बदल म्हणून ऑनलाइन शिक्षणाचा स्वीकार केला पाहिजे आणि शाळा पुन्हा सुरू होईपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. डेटामधून ऑनलाइन शिक्षणाचे यश दिसून येत असल्यामुळे पालकांनी त्यांची भिती व चिंता दूर करत त्यांच्या मुलांना वर्गामध्ये मिळणा-या शिक्षणाप्रमाणेच ऑनलाइन वर्गामध्ये देखील शिक्षणाप्रती रूची दाखवण्यास प्रोत्साहित केले पाहिजे.
