Tuesday, June 16, 2026
Business

गोदरेज इंटेरिओने भारतभरात आपला आरोग्यसेवा व्यवसाय अधिक मजबूत केला

मुंबई –   गोदरेज समूहातील प्रमुख कंपनी गोदरेज अँड बॉयसने घोषणा केली आहे कीघरगुती व संस्थात्मक विभागातील भारतातील आघाडीचा फर्निचर ब्रँड गोदरेज इंटेरिओ या त्यांच्या व्यवसायाने देशात सुरु असलेल्या कोविड संकटामुळे वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी बेड्स उत्पादनाच्या आपल्या क्षमतेमध्ये गेल्या वर्षभरात दररोज २.५ पटींनी वाढ केली आहे.  गोदरेज इंटेरिओने १०,००० पेक्षा जास्त हॉस्पिटल व आयसीयू बेड्स पुरवले असून तितक्याच संख्येने विशेष गाद्या व इतर ऍक्सेसरीज देखील रुग्णालयांना पुरवल्या आहेत.  गेल्या १४ महिन्यात गोदरेज इंटेरिओने महाराष्ट्रातील खालापूर येथे एक नवा उत्पादन प्लांट सुरु केला आहे.  हा नवा प्लांट लवचिक प्रोडक्शन लाईनने सुसज्ज असून इतर आरोग्यसेवा एक्सेसरीजबरोबरीने दर दिवशी ३०० हॉस्पिटल बेड्स बनवण्याची क्षमता देखील या प्लांटमध्ये सामावून घेतली जाऊ शकते.

गोदरेज अँड बॉयस आरोग्यसेवा क्षेत्रात गेली ३० वर्षे कार्यरत आहे.  आर्थिक वर्ष २०२२ मध्ये आपले इंटेरिओ डिव्हिजन आरोग्यसेवा व्यवसायात २० ते २५% वाढ घडवून आणण्याची शक्यता असल्याची घोषणा कंपनीने नुकतीच केली.  पश्चिम भारतात आरोग्यसेवा व्यवसाय अधिक मजबूत करण्याबाबत गोदरेज इंटेरिओचे मार्केटिंग (बीटूबी) विभागाचे असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट श्री. समीर जोशी यांनी सांगितले, “भारतातील आरोग्यसेवा क्षेत्रावर आम्ही नेहमीच भर देत आलो आहोत आणि आम्ही मानतो की या क्षेत्रात वाढीच्या प्रचंड क्षमता आहेत.  एकंदरीत संघटीत आरोग्यसेवा फर्निचर उद्योगात बाजारपेठेतील आमचा हिस्सा १३% आहे तर पश्चिम भारतातील बाजारपेठेचा गोदरेज इंटेरिओच्या आरोग्यसेवा उद्योगातील हिस्सा २६% आहे.  एप्रिल २०२० पासून गेल्या वर्षभरात आम्ही २२% वाढ साध्य केली तर आर्थिक वर्ष २०२१ मध्ये उद्योगक्षेत्राने १५% वाढ नोंदवली. या क्षेत्राकडून येणाऱ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही आमच्या आरोग्यसेवा व्यवसायाच्या एकंदरीत उलाढालीच्या १०% पेक्षा जास्त रकमेची गुंतवणूक नुकतीच केली.”  पश्चिम भारतातील गोदरेज इंटेरिओच्या प्रमुख ग्राहकांमध्ये सरकार, खाजगी रुग्णालये व इतर आरोग्यसेवा संस्था यांचा समावेश आहे.

गोदरेज इंटेरिओच्या ९५% आरोग्यसेवा उत्पादनांची विक्री स्थानिक मूल्य वर्धनामार्फत होत असल्याने त्यामुळे गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळतेदेशात एक फर्निचर कंपोनंट इकोसिस्टिम निर्माण होते व अशाप्रकारे भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत अभियानातही योगदान दिले जाते.  यामुळे भारताच्या बाहेर फर्निचर निर्यातीला प्रोत्साहन दिले जाते.  याआधी गोदरेज इंटेरिओने मॉरिशसश्रीलंका व मध्य पूर्वेत देखील आपली उत्पादने व सेवा पुरवल्या आहेत.  सध्या ते सार्क (साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन) आणि मिना (मिडल ईस्ट अँड नॉर्थ आफ्रिका) देशांना आरोग्यसेवा क्षेत्रात व प्रयोगशाळेत वापरले जाणारे फर्निचर निर्यात करत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading