Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNE

बुद्ध पौर्णिमेनिमीत्त ‘धम्म पहाट’ संपन्न

पुणे – तथागत गौतम बुद्धांच्या 2556 व्या जयंतीनिमित्त सम्यक विहार व विकास केंद्र बोपोडी याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुण्यनगरीच्या उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर त्याचप्रमाणे रिपब्लिकन नेते परशुराम वाडेकर यांच्या संयुक्त विद्यमाने धम्म पहाट या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अत्यंत मंगलमय आणि आल्हाददायक वातावरणात पहाटे पाच वाजता या संगीतमय धम्म पहाट कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

प्रथम नमो गौतमा, माझ्या भिमाच्या नावाचं कुंकू लावीलं रमानं अशा एकाहून एक सुरेख भिम बुद्ध गीतांच्या जुगलबंदी ने या कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली. संपूर्ण वातावरण जणू बुद्धमय झाले होते.

पहाटे ठीक पाच वाजता उपमहापौर सुनिता वाडेकर यांच्या हस्ते बुद्ध प्रतिमेस पुष्प अर्पण करून बुद्ध वंदनेने या सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सांगीतिक कार्यक्रमाला कीबोर्ड साठी चिंतन मोठा,बासरीसाठी प्रसिद्ध कलाकार सचिन वाघमारे, सॅक्सोफोनसाठी झी मराठी फेम प्रथमेश मोरे ,व्हायोलिन शैलेश देशपांडे ,तबला हर्षद गणबोटे, मशीन असिफ इनामदार,तर प्रकाश सुतार यांनी सतार वादन करत कार्यक्रमाची रंगत वाढवली. या कार्यक्रमाचे निवेदन प्रसिद्ध सूत्रसंचालक दीपक जी मस्के यांनी केले. कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम नागरिक आणि रसिकांसाठी फेसबुक द्वारे लाइव्ह दाखवण्यात आला.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रिपाई शिवाजीनगर अध्यक्ष अविनाश कदम, ज्ञानेश जावीर, योगेश गायकवाड अन्थोनी, नीलेश वाघमारे, राजेंद्र शिंदे, संतोष खरात आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading