कोरोना – राज्यात सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्येत मोठी घट
मुंबई – गेल्या २४ तासांत राज्यात २६ हजार १३३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६८२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५५ लाख ५३ हजार २२५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ८७ हजार ३०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ३ लाख ५२ हजार २४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आज दिवसभरात ४० हजार २९४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण ५१ लाख ११ हजार ९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.०४ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५७ टक्के एवढा आहे. आज नोंद झालेल्या एकूण ६८२ मृत्यूंपैकी ३९२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २९० मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत.
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी २७ लाख २३ हजार ३६१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५५ लाख ५३ हजार २२५ (१६.९७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २७ लाख ५५ हजार ७२९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २२ हजार १०३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
पुणे कोरोना अपडेट
- दिवसभरात ८४० पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
- दिवसभरात १९४९ रुग्णांना डिस्चार्ज.
- पुण्यात करोनाबाधीत ४३ रुग्णांचा मृत्यू. २३ रूग्ण पुण्याबाहेरील.
- १३०९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४६४९१६.
- ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १२३३०.
- एकूण मृत्यू -७९६८.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४४४६१८.
- आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ११३८०.
