Thursday, September 3, 2026
Latest NewsPUNE

राजपूत सभेतर्फे तृतीयपंथीयांना धान्य किट

पुणे : कोरोनामुळे सुरु असलेल्या दुस-या लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी कोरोना योद्धे पोलीस बांधव रात्रंदिवस चोखपणे पार पाडत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन काळात सलग १५ दिवस पोलीस बांधवांना, रस्त्यावरील गरजूंना जेवणाची पॅकेटस्, ताक आणि उपेक्षित असलेल्या तृतीयपंथी यांना धान्य किटचे वाटप राजपूत सभा पुणे आणि सप्तश्रृंगी महालक्ष्मी मंदिर बिबवेवाडी यांच्यावतीने करण्यात आले.

सामाजिक कर्तव्य म्हणून दोन्ही संस्थांना आपला खारीचा वाटा उचलत बिबवेवाडी ते मार्केटयार्ड परिसरातील बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस बांधवांकरीता हा उपक्रम राबविला. तसेच गरजू नागरिक, तृतीयपंथी यांना देखील मदत देण्यात आली. यावेळी संस्थेच्यावतीने कार्याध्यक्ष मोतीसिंह परदेशी, याज्ञदत्त हजारे, दीपकसिंह मिरधे, आशुतोष परदेशी आदींनी सहभाग घेतला.

कार्याध्यक्ष मोतीसिंह परदेशी म्हणाले, पोलीस कर्मचारी व त्यांच्यासोबत काम करणारे स्वयंसेवक पुणेकरांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटत आहेत. त्यामुळे त्यांना लॉकडाऊनकाळात सलग १५ दिवस जेवणाचे पॅकेटस् व ताक याचे वाटप संस्थेच्यावतीने करण्यात आले. तृतीयपंथीयांची परिस्थिती देखील बिकट असून लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांना धान्यरुपी मदत आम्ही दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading