एएनपी केअर फाउंडेशनतर्फे गरजूंसाठी मोफत डायलिसिस
पुणे : एएनपी (अडवाणी अँड फेरवानी) केअर फाउंडेशनच्या वतीने समाजातील गरीब व गरजू रुग्णांसाठी पूर्णतः मोफत डायलिसिसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रहाटणी येथील शिवराजनगर येथे हे डायलिसिस केंद्र उभारण्यात आले असून, गेल्या दोन महिन्यात २०५ रुग्णांचे डायलिसिस केले आहे, अशी माहिती एएनपी केअर फाउंडेशनचे संस्थापक संचालक मनोहर फेरवानी यांनी दिली. प्रसंगी फाउंडेशनचे संचालक सुरेश जेठवानी, अशोक वासवानी उपस्थित होते.
मनोहर फेरवानी म्हणाले, “कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर डायलेसिसची गरज असणाऱ्या रुग्णांना हा उपक्रम नवसंजीवनी ठरला आहे. अडवाणी-फेरवानी यांच्या पुढाकारातून एएनपी केअर फाउंडेशनमार्फत हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. या डायलिसिस केंद्रावर अकरा मशिन्स बसविण्यात आल्या आहेत. त्यातील चार मशीन सध्या कार्यरत असून, महिनाभरात आणखी सात मशीन पूर्ण क्षमतेने कार्यरत होतील. दोन तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षित तंत्रज्ञ आणि स्टाफ डायलिसिस करत आहे. येथील स्वच्छता आणि रुग्णाला देण्यात येणाऱ्या सुविधांमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे.”
“सोमवार ते शनिवार रोज सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेत रुग्णांना डायलिसिस सेवा दिली जात आहे. गरजू रुग्णांनी रॉयल मायस्टिक, २८/2 ब, शिवराजनगर, रहाटणी, पिंपरी-पुणे येथे किंवा ९९७००४३००५/०६ किंवा contact@anpcarefoundation.org येथे नावनोंदणी करावी. अधिकाधिक गरजू रुग्णांनी या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा,” असे आवाहनही फेरवानी यांनी केले आहे.
“कोरोनामुळे अनेक ठिकाणी डायलिसिस सुविधांवर परिणाम झाला होता. या रुग्णांना तत्परतेने सेवा मिळावी म्हणून हे सेवा केंद्र सुरु केले आहे. पिंपरी–चिंचवडसह पुणे शहर, आंबेगाव व खेड तालुक्यातील गरजू रुग्णांना ही डायलिसिस सुविधा उपलब्ध होत आहे,” असे सुरेश जेठवानी म्हणाले.
समाजसेवी संचालक मंडळअडवाणी-फेरवानी केअर फाऊंडेशन संचालक मंडळात मनोहर फेरवानी, सुनील अडवाणी, घनश्याम सुखवानी, संजय मीरचंदानी, सुरेश जेठवानी, रवी फेरवानी, नंदकुमार उर्फ नाना काटे, जवाहर कोटवानी, मोती मिलानी, अशोक वासवानी, रोशन तेजवानी, ऋषी अडवाणी यांचा समावेश आहे. उद्योजक फतेचंद रांका यांच्या हस्ते नुकतेच या डायलिसिस सुविधा केंद्राचे उद्घाटन झाले.
अडवाणी-फेरवानी केअर फाऊंडेशन संचालक मंडळात मनोहर फेरवानी, सुनील अडवाणी, घनश्याम सुखवानी, संजय मीरचंदानी, सुरेश जेठवानी, रवी फेरवानी, नंदकुमार उर्फ नाना काटे, जवाहर कोटवानी, मोती मिलानी, अशोक वासवानी, रोशन तेजवानी, ऋषी अडवाणी यांचा समावेश आहे. उद्योजक फतेचंद रांका यांच्या हस्ते नुकतेच या डायलिसिस सुविधा केंद्राचे उद्घाटन झाले.
